'के.एम.सी. कॉलेज'चे पथनाट्यद्वारे मतदान जागृती अभियान

 कोल्हापूर/ ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क, दि. 08 : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मतदार जागृती अभियाना अंतर्गत महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी कलावंतांनी 'मतदार राजा जागा हो ' हे प्रबोधनपर पथनाट्य सादर केले. 

    यामध्ये मतदान करणे हे नागरिकाचा महत्वपूर्ण अधिकार आहे. सर्वांनी तो योग्यरित्या बजावलाच पाहिजे. लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान दिले पाहिजेल हा संदेश यातून जनतेला दिला. गंगावेश (के. एम. टी.) बसस्थानक आणि भवानी मंडप परिसरात सादर केलेल्या या पथनाट्यास प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

            यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब उलपे, पर्यवेक्षक डॉ.अमित रेडेकर, अधीक्षक विनायक मेस्त्री, प्रा.पी.डी.तोरस्कर, प्रा.कुमुदिनी देसाई, प्रा.रवींद्र मांगले, डॉ.सचिन धुर्वे, डॉ.सयाजी गायकवाड, डॉ.किरण भोसले, डॉ.जोत्स्ना शिवणकर, डॉ.प्रशांत नागावकर उपस्थित होते.

Comments