कोल्हापूर, ता. 24 : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने आज (ता. 24) निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयामध्ये करण्यात येत असलेल्या स्ट्रॉग रुमची प्रशासक तथा मुख्य निवडणूक अधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पाहणी केली. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली.
सदरची पाहणी कसबा बावडा, लाईन बाजार, महासैनिक प्रशिक्षण केंद्र, दसरा चौक शहाजी कॉलेज, यशंवतराव चव्हाण सभागृह, गांधी मैदान, दुधाळी पॅव्हेलियन हॉल, राजोपाध्येनगर हॉल, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम या निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयाची पाहणी करुन येथील स्ट्रॉग रुमची पाहणी केली. या ठिकाणी स्ट्रॉग रूम चे नियोजना बाबत आढावा घेवून स्ट्राँगरुमच्या खिडक्या बंदिस्त करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर मतमोजणी संदर्भात नियोजनाबाबतची माहिती घेतली.
मंगळवापासून नामनिर्देशन पत्रांची विक्री तसेच नामनिर्देशन अर्ज सादर करण्याची
प्रक्रिया सुरू झाली असून आज अखेर 1046 नामनिर्देशनपत्रे विक्री झाली आहेत.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त परितोष कंकाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे
उपस्थित होते.


