मतदारांनो, जागे व्हा; मनपा निवडणुकीत ‘योग्य’ उमेदवार निवडा

वॉर्डातील समस्या, प्रश्न आजही गंभीर; आमिष, आश्वासन नको, काम दाखवा

कोल्हापूर, (ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क) दि. 25 : महाराष्ट्र राज्यात नुकत्याच नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर राज्यातील सुमारे 29 महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. स्वयंघोषित उमेदवारांनी मतदारांच्या दारी ये-जा सुरू केली आहे. मात्र, मतदारांनी उमेदवारांच्या आमिष, आश्वासनांना बळी न पडता यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत योग्य उमेदवार निवडण्याची वेळ आली आहे. मतदारांनो, भविष्यात वॉर्ड, परिसरात प्रश्न, समस्यांचा डोंगर उभा राहिल्यावर पश्चाताप करण्याऐवजी यंदाच्या निवडणुकीत ‘योग्य’ उमेदवाराला आपलं मत द्या.

 


कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. काका, मामा, ताई, माई, दादा, आजी, भावड्या.... अशा प्रकारे नात्याने हाक मारून आता मतदारांना भावनिक करून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न बरेच उमेदवार करत आहेत. यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत बर्‍याच उमेदवारांनी गोळाबेरीज करून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. तर, यातील काही नागरिकांनी समाजसेवेचं व्रत मनाशी बाळगून माजी नगरसेवक, महापौर यांनी केलेल्या हलगर्जीपणा, दुर्लंक्षपणा आदीला वैतागून ‘उमेदवारी’ स्वयंघोषित केली आहे. त्यामुळे मतदारांनो, आपला ‘योग्य’ उमेदवार ओळखा आणि ‘त्या’ उमेदवाराला निवडून द्या.

....आता ‘शत्रू’ झाले ‘मित्र’

  • महापालिकेच्या राजकारणात अनेक पक्षांनी उडी घेतली आहेे. मात्र, यातील अनेक पक्ष हे याअगोदर जनतेसमोर ‘शत्रू’ म्हणून दिसत असले तरी ते आतल्या बाजूने एकमेकांचे कसे ‘मित्र’ होते आणि आजही आहेत. याचं उत्तम उदाहरण मतदारांना या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पहायला मिळत आहे. त्यामुळे ‘शत्रू’ बनलेल्या ‘मित्राचं’ किंवा ‘मित्र’ बनलेल्या ‘शत्रूचं’ काय करायचं? ते मतदारांनी ठरवलं पाहिजे. त्यामुळे मतदारांसमोर.... शत्रू किंवा मित्र बनून मत मागायला आलेल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्यायचं की नाही? याचा सखोल विचार मतदारांनी करायचा आहे. म्हणूनच, मतदारांनो, जागे व्हा; निवडणूक आलीय.



मतदारांना हवाय पर्याय...

महापालिकेच्या राजकारणात मोजकेच पक्ष निवडणूक रिंगणात उतलेले दिसत आहेत. त्यामुळे मागील वेळी जे ‘सत्ताधारी’ होते ते आता विरोधक म्हणून आहेत. आणि त्याअगोदर जे ‘विरोधक’ होते ते आता सत्ताधारी म्हणून आहेत. अर्थात सत्ताधारी आणि विरोधक हे संगनमताने ‘सत्तेची खुर्ची’ संगीत खुर्चीप्रमाणे एकमेकांसाठी आळीपाळीने बसून वाटून घेत असल्याचे समजत आहे. त्यामुळे ह्यातील गडगंज झालेल्या पक्षांना बगल देण्यासाठी मतदारांपुढे आता नवीन पक्षाचा पर्याय हवा आहे, असेच एकंदरीत चालू राजकारणावरून समजत आहे. इतर पक्षांच्या उमेदवारांनीही खचून न जाता समाजसेवेचं व्रत बाळगून न घाबरता मनपाच्या निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे. तरच, मतदार नवीन पर्याय म्हणून सत्ताधारी, विरोधक अशा मोजक्या पक्षांना बगल देऊन ‘पर्यायी’ पक्षाच्या उमेदवाराला निवडणूक देतील, अशीच मतदारांपुढील स्थिती असल्याचे समजत आहे. म्हणूनच मतदारांना पर्याय हवा आहे, हेच आढळत आहे.



Comments