- आरपीआय (आठवले) वाहतूक आघाडीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. संजीव भोर यांना निवेदन सादर
कोल्हापूर/दिनांक 29 जुलै 2025 : शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे करण्यास बंदी असतानाही कोल्हापूर येथील (आरटीओ) प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यालयीन वेळेत नुकताच दिनांक 24 जुलै 2025, गुरूवारी या दिवशी मोटार वाहन निरीक्षक श्री. संदीप वसंत गडकर या अधिकार्याने धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 सह शासन आदेशाचे उल्लंघन केले आहे. म्हणनू त्यांच्यावर आणि त्यांच्या वाढदिवसाला हजेरी लावणार्या अधिकारी, कर्मचार्यावरही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वाहतूक आघाडी, कोल्हापूर कार्याध्यक्ष सलमान मौलवी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
वाढदिवसावेळी (विनागणवेशात)बड्डे बॉय अर्थात श्री. संदीप वसंत गडकर या अधिकार्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयतील अधिकारी/कर्मचारीही गणवेशात हातातील काम बाजूला ठेवून/टाकून उपस्थित होते. मात्र, जिल्ह्यातून आपल्या कामासासाठी आलेले नागरिक ताटकळत हाताश होऊन तासन्तास उभे होते. मात्र, याची कोणत्याही अधिकारी/कर्मचारी यांना दया आली नाही. यातील काही नागरिकांनी आमच्या संघटनेकडे व्यथा मांडल्या. म्हणूनच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वाहतूक आघाडीच्या वतीने वाढदिवस साजरे करणार्या अधिकारी/कर्मचारी यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच याची नोंद संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकात करावी, अशीही मागणी केल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वाहतूक आघाडी, कोल्हापूर कार्याध्यक्ष सलमान मौलवी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : कार्यालयीन वेळेत नागरिकांची कामे प्रलंबित ठेऊन जल्लोषात वाढदिवस साजरा करणाऱ्या कोल्हापूर आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक श्री. संदीप वसंत गडकर यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 आणि शासन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. संजीव भोर यांना आरपीआय (आठवले) वाहतूक आघाडीच्या वतीने देण्यात आले. यावेळी उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वाहतूक आघाडी, कोल्हापूर संघटनेचे कोल्हापूर कार्याध्यक्ष सलमान मौलवी, जिल्हा सचिव सतीश माळगे, राधानगरी तालुका अध्यक्ष कुंडलिक कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे,प्रवीण आजरेकर, रशीद मुजावर, अनिल नलावडे, समध सय्यद, अमीन शेख आदी.
- यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना मा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वाहतूक आघाडी, कोल्हापूर कार्याध्यक्ष सलमान मौलवी म्हणाले की, शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे करण्यास शासन निर्णयानुसार बंदी आहे. तरीही काही मुजोर अधिकारी/कर्मचारी या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवतात. तसेच शासन निर्णयाचं उल्लंघन करताना दिसतात. असे प्रकार आरटीओ कार्यालयात नवीन नाही. याअगोदरही अनेक कार्यालयात असे अधिकारी/कर्मचारी यांचे वाढदिवस साजरे केले जातात. मात्र, अशा अधिकारी-कर्मचार्यांना सामान्य नागरिकांचे प्रश्न, काम यांच्याशी काहीही देणंघेणं नाही, असे वागत आहेत, हेच दुर्देव आहे.
कोल्हापूर आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक संदीप वसंत गडकर या अधिकार्याने वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला. केक आणून तो कार्यालयीन वेळेत कापला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आरटीओमधील अधिकारी प्रवीण सातारे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शितल कोळी, पूजा साळुंखे, हिनाकौसर सौदागर, यांसह काही कर्मचारी व इतर अशी पूर्ण टीम या वाढदिवसाच्या जल्लोष कार्यक्रमात शासकीय कामकाज बाजूला ठेवून/हातातील काम टाकून जाणीवपूर्वक उपस्थित राहिले होते.
- व्ययक्तीक पातळीवर प्रत्येकाने वाढदिवस साजरा करावा. मात्र, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी शासकीय वेळेत शासकीय काम बाजूला ठेवून असे वाढदिवस साजरे करू नयेत, त्यांनी नागरिकांच्या कामांना, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांची कामे करावीत. यासाठीच त्यांची शासकीय सेवक म्हणून नेमणूक केलेली आहे, याची जाणीव त्यांनी ठेवावी. मात्र, आरटीओ कार्यालयातील आलिकडील प्रकार पाहता अशा अधिकार्यांना शासकीय सेवकाचे अधिकार/कर्तव्य याची जाणीव नसल्याचे आढळत आहे. म्हणून आम्ही संघटनेच्यावतीने आरटीओ कार्यालयात वाढदिवस साजरा करणार्या अधिकार्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 सह शासन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्यांच्या या कृत्याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकालाही करावी, अशी मागणी याव्दारे केली आहे, असेही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वाहतूक आघाडी, कोल्हापूर कार्याध्यक्ष सलमान मौलवी यांनी सांगितले.
यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.संजीव भोर म्हणाले की, अशा पद्धतीने वाढदिवस साजरा झाला आहे, हे मला माहित नव्हते. आपण सर्वानी याबाबत मला अवगत केले त्याबद्दल धन्यवाद. याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वाहतूक आघाडी, कोल्हापूर संघटनेचे कोल्हापूर कार्याध्यक्ष सलमान मौलवी, जिल्हा सचिव सतीश माळगे, राधानगरी तालुका अध्यक्ष कुंडलिक कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे,प्रवीण आजरेकर, रशीद मुजावर, अनिल नलावडे, समध सय्यद, अमीन शेख यांसह संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
आरटीओ कार्यालयातच नव्हे तर इतरही काही कार्यालयात अधिकारी/कर्मचारी यांचे वाढदिवस अगदी थाटात साजरे केले जातात. पण, हे वाढदिवस कार्यालयीन वेळेत शासकीय कामकाज प्रलंबित ठेवून केले जातात, हे चुकीचे आहे. अशा कृत्यांना शासकीय पातळीवर अंकुश असायला हवा. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. तत्पूर्वी वाढदिवस करणारे संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे म्हणणे देखील जाणून घेतले पाहिजे.
- सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कर्यकर्ते अॅड. तौसिफ शेख.