कोल्हापूर/ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क : करवीर तालुक्यासह जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिंडनेर्ली गावचे सचिन पांडूरंग कदम यांना राजर्षी शाहू महाराज युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, ट्रॉफी देऊन सचिन पांडूरंग कदम यांचा गौरव करण्यात आला. कोल्हापूर येथे नुकताच (दि. 8 जून 2025) पुरस्कार सोहळा पार पडला.
कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी यांच्या वतीने आयोजित साहित्यिक कै.प्रा.डॉ.सुरेश कुराडे यांच्या स्मृती पित्यार्थ कोल्हापुरातील करवीर नगर वाचन मंदिर येथील सभागृहात हा पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी राज्यस्तरीय चौथे मिरग नक्षत्र कवी संमेलन देखील पार पडले.
याअगोदर सचिन कदम यांनी भारीप बहुजन महासंघ करवीरचे उपाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी करवीरचे मा.अध्यक्ष आणि भीम ब्रिगेड संघटना कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून पदे भूषविली आहेत.
तसेच सचिन कदम यांनी या विविध संघटनाच्या माध्यमातून अनेक प्रकारची सामाजिक कार्ये पार पाडली आहेत. त्यामुळे त्यांचा सामाजिक क्षेत्रात नावलौकिक कायम आहे.