'क्षेत्र अधिकारी' पदासाठी करा अर्ज; मुदत 25 जून 2025 पर्यंत

कोल्हापूर/ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क  : कोल्हापूर डाक विभागामार्फत टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा करिता 'क्षेत्र अधिकारी' नेमावयाचे आहेत. थेट अभिकर्ता म्हणून काम करु इच्छिणा-या उमेदवारांनी आपला अर्ज प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर 416003 या पत्त्यावर दि. 25 जून 2025 पुर्वी आपल्या केंद्र, राज्य सरकारच्या संस्था मधून निवृत्त प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य संबधित दस्ताऐवजाच्या सत्यप्रती सोबत पाठवावे, असे आवाहन प्रवर डाक अधीक्षकांनी केले आहे.

पात्रता व अन्य मापदंड -:

वयोमर्यादा-केंद्र, राज्य सरकारच्या संस्थांमधून निवृत्त अधिकारी व निवृत्त ग्रामीण डाक सेवक, जास्तीत जास्त वयाची कोणतीही अट नाही.
पात्रता केंद्र, राज्य सरकारच्या संस्थांमधून निवृत्त अधिकारी व निवृत्त ग्रामीण डाक सेवक ज्याच्या विरुद्ध कोणतीही शिस्तभंगाची चौकशी प्रलंबित नसावी.
  • अनुभव-
  • आवेदनकर्त्याला विमा क्षेत्राबाबत तसेच विपणन कुशलता असणे आवश्यक.
  • जो उमेदवार क्षेत्र अधिकारीसाठी निवडला जाईल त्याला टपाल विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन, प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.
  1. थेट मुलाखतीद्वारे टपाल जीवन विमा ग्रामीण टपाल जीवन विमाचे उमेदवार नियुक्त केले जातील. नियुक्त उमेदवारांना आंतरिक प्रशिक्षण देण्यात येईल.
  2. नियुक्त उमेदवारांना PLI Mobile training App द्वारे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.
  3. नियुक्त उमेदवारांना परवाना देण्याकरिता 200 रुपये आणि परवाना परीक्षेसाठी वेळोवेळी निर्धारीत फी जमा करावी लागेल.
  4. निवड झालेल्या क्षेत्र अधिकाऱ्यांना 5 हजार रुपये राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे तारण म्हणून ठेवावे लागतील.
Comments